लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
पुजा मडावी…
मारेगाव शहरातील अवघ्या २३ वर्षाच्या वैभव प्रमोद किन्हेकार (प्रभाग क्रमांक १७) याची पंजाब नॅशनल बँक येथे प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड झाली आहे.इतक्या कमी वयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून यश संपादन केल्यामुळे सर्व स्तरावरून त्याचे कौतुक होत आहे.
वैभवचे वडील पोस्ट ऑफिस मारेगाव येथे कार्यरत असून त्यांचे मूळ गाव मारेगाव तालुक्यातील चिंचाळा हे आहे. ग्रामीण भागातून येऊन कसलाही स्पर्धा परीक्षेचा अनुभव नसताना फक्त मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नियोजनबध्द केल्यास लवकर यश मिळते.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता तयारी केल्यास यश नक्कीच मिळते हे आज वैभव च्या यशातून सिद्ध झाले.त्याला १२ मध्ये ८७% होते. त्याला डॉक्टर , इंजिनियर होता आले असते मात्र स्पर्धा परीक्षा चे तयारी करिता त्याने बी.एस.सी. ला प्रवेश घेतला आणि ३ वर्ष नियोजनबध्द अभ्यास केला.वैभवच्या कष्टाचे आज चीज होत त्याची निवड झाली.
त्याची मोठी बहीण भावना किन्हेकार इंजिनिअर असुन ती एका नामांकित कंपनीत काम करते.
वैभवने आपल्या यशाचे श्रेय आई वडील,बहीण ,मामा – मामी,काका – काकू, नातेवाईक तसेच डॉ.सचिन मडावी समाज कल्याण अधिकारी यांना दिले आहे.




