– समस्त ग्रामवासियांचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
पवित्र श्रावण मासात तालुक्यातील घोडदरा येथे २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता समस्त ग्राम वासियांच्या पुढाकाराणे सामूहिक तीर्थ पूजनानिमित्त भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२३ ऑगस्ट रोजी घोडदरा येथे आयोजित या भजनाच्या कार्यक्रमात गायक राजू महाराज विरदंडे (घाटंजी),गायक शुभम विरुटकर (घाटंजी), तबलावादक राजू कोवे (वडकी), गायिका कु.सलोनी सुकटे (घाटंजी), हार्मोनियम अक्षय नगराळे (घाटंजी), गायक
रमेश विरुटकर (पंगडी),आदी आपल्या भजनातून जनजागृती करणार आहे.

परिणामी या भजनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त घोडदरा ग्रामवासीयांनी केले आहे.




