— मारेगाव शहरातील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव शहरातील एका ३५ वर्षीय युवकाने, मारेगाव स्थित मनोरंजन क्लब मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवार ता.१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेदरम्यान उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या युवकाचा आज वाढदिवस हे येथे उल्लेखनीय.
नवीन मोतीगीरी बामणे (३५) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून नवीन मारेगाव तालुक्यातील टाकरखेडा येथे वास्तव्यास होते.
दरम्यान रविवार १ सप्लाटेंबर रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान नवीन हे शहरातीलच एका क्लब मध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. वृत्तलिहीपर्यंत मृतक नवीन यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नव्हते.
