– गळफास घेऊन जीवन संपविले
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील गोंडबुरांडा येथे वर्षभरापूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या एका नवविवाहितेने गळफास घेत जीवन संपविल्याची मन हेलावून सोडणारी घटना २० मे रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान उघडकीस आली.चार महिन्याच्या गरोदर विवाहित महिलेने असे टोकाचे पाऊल उचलल्याने गोंडबुरांडा परिसरात पुरती शोककळा पसरली आहे.
रीना सुनील मुसळे (२०) असे नवविवाहित आत्महत्या केलेल्या महीलेचे नाव असुन अगदी वर्षभरापूर्वीच तिचा गावातीलच एका युवकाशी प्रेम विवाह झाला होता. दरम्यान विवाहित महिला ही चार महिन्याची गरोदर असल्याची माहिती आहे.
आज तिने गावातीलच राहत्या घरी सायंकाळी सहा वाजे दरम्यान गळफास घेत स्वतःची जीवन यात्रा संपवली. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप करू शकले नसले तरी चार महिन्याच्या गरोदर महीलेने असे टोकाचे पाऊल उचलत आपली जीवन यात्रा संपविल्याने गोंडबुरांडा परिसरात पूरती शोककळा पसरली आहे.
घटनेचा पुढील तपास पो.उ.नी.ज्ञानेश्वर सावंत,ना.पो.का.अजय वाभीटकर, रजनीकांत पाटील,शंकर बारेकर करीत आहे.
