– पहापळ उपकेंद्राचा उपक्रम
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील पहापळ उपकेंद्र अंतर्गत पांढरकवडा येथे २३ सप्टेंबर रोजी आयुष्यमान भारत एनसीडी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना देठे व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली परिसरातील शेकडो भगिनींची तसेच नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.
२३ सप्टेंबर रोजी पहापळ उपकेंद्र द्वारा आयोजित पांढरकवडा येथील एनसीडी शिबिरात बीपी, डीएम,ओरल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, सर्वीकल कॅन्सर यासह गरोदर माता तपासणी, टीबी तपासणी, कुष्ठरोग तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या.यावेळी शेकडो महिलांसह ग्रामस्थांनी सदर शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सीमा तसेच समुदाय आरोग्य अधिकारी, उपकेंद्र पहापळ राजश्री तिकडे , आरोग्य सेविका वंदना पुसदेकर, बीएफ कोकीळा उमरे, आशा सेविका मनीषा आत्राम यांनी सदर शिबिराचे महत्त्व समजावून सांगितले.
तालुका आरोग्य अधिकारी अर्चना देठे व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद शिंदे यांचे मार्गदर्शनात आयोजित एनसीडी शिबिरा करीता अंगणवाडी सेविका सीमा आत्राम यांचे सहकार्य लाभले.





