– ग्रामीण १५१,शहरी १७ दुर्गोत्सव तर ७ शारदोत्सव मंडळांची नोंदणी
– ‘उदो बोला उदो’ च्या गजरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा : सर्वत्र आनंदाला उधाण
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
महाराष्ट्र सह अवघ्या देशभरात उत्साहात साजरा होणारा नवरात्रोत्सव ता . १५ ऑक्टोंबर पासून आरंभ झाला.सर्वत्र ‘उदो बोला उदो’ च्या गजरात आदिशक्ती विराजमान झाल्या.मारेगाव शहरातही वाजत गाजत,आकर्षक रोशनाईसह,नयनरम्य देखावे उभे करुन मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.यावर्षी तालुक्यात १५१ ग्रामीण तर १७ शहरी दुर्गोत्सव मंडळे असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा होतो.यात आकर्षक मंडप देखावे उभे करून दुर्गा मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी दुर्गोत्सव उत्सवाची सांगता केली जाते.

दरम्यान याही वर्षी मारेगाव शहरासह परिसरात मोठ्या आनंदात ता. १५ ऑक्टोंबर रोजी दुर्गोत्सव आरंभ झाला.यावेळी तालुक्यातील ग्रामीण भागात १५१ तर शहरी भागात १७ नोंदणीकृत मंडळांनी आकर्षक मंडपाच्या देखाव्यात,वाजत गाजत मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.तालुक्यात ७ नोंदणीकृत शारदा उत्सव मंडळे आहेत.

मारेगाव शहरात विविध दुर्गोत्सव मंडळांनी आपापल्या परीने मनमोहक रोषणाईने नटलेले नयनरम्य देखावे उभे केले असून लहान थोरांसह सर्वांनाच आकर्षित करीत आहे.





