– वडिलांचा आधारवड हरवला : मायेच्या सावलीत झेप
– तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील कु.गौरी प्रशांत पेंदोर (स्व.बबनरावजी पेंदोर गुरुजी यांची नात) हीची ‘तामिळनाडू मर्चंट नेव्हीत’ निवड झाली आहे.विशेष म्हणजे तामिळनाडू मर्चंट नेव्हीत निवड झालेली गौरी ही महाराष्ट्रातुन व यवतमाळ जिल्ह्यातुन प्रथम मुलगी आहे.परिणामी गौरी कौतुकास पात्र आहे.
आपली मुलगी शिकावी-शिकुन खुप मोठी व्हावी ही आई-वडीलांची इच्छा.परंतु चार वर्षांपूर्वी अघटीत घडले.गौरीने आपल्या वडिलांचा ‘आधारवड’ कायमचा गमावला.परंतु ती डगमगली नाही.कठोर मेहनत करून आपल्या माय माऊलीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवीले.
गौरीने आपले प्राथमिक शिक्षण वेगाव येथील श्री.जगन्नाथ महाराज विद्यालयातुन पुर्ण केले.दहाव्या वर्गापर्यंतचे शिक्षण वणी येथील लायन्स स्कूल येथे पूर्ण करून पुढील शिक्षणाकरिता औरंगाबाद गाठले.तिथे गौरीने ज्ञानगंगा स्पर्धा परीक्षा क्लासेस जॉईन केले.येथूनच गौरीचा आपल्या यशाच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
वडिलांचे छत्र हरवूनही गौरीने केवळ जिद्दीच्या बळावर दैदीप्यमान यशाला गवसनी घातली.यात आईची पदोपदी सोबत मिळाली.परिणामी महाराष्ट्रातून व यवतमाळ जिल्ह्यातून प्रथम मुलगी म्हणून गौरीची तामिळनाडू नेव्ही मर्चंट येथे निवड झाल्याने गौरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
गौरी आपल्या यशाचे श्रेय आई तसेच वेगाव येथील शिक्षकांना देते.
स्वातंत्र्यदिनी ‘गौरीचा’ गौरव….!
गौरी पेंदोर हिची ‘तामिळनाडू मर्चंट नेव्हीत’ निवड झाल्याने वेगाव येथे ‘गौरीचा गौरव’ करण्यात आला.यावेळी वेगांव ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य,कर्मचारी व गांवकरी उपस्थित होते.





