– विविध कार्यक्रमांचे आयोजन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
जगाला प्रेम, करुना,मैत्री,शांतीचा संदेश देणारे महाकारुणीक तथागत गाैतम बुद्ध यांची २५६७ जयंती शहरात जयभीम उत्सव समिती यांचे वतीने ५ मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला हेमंत नरांजे यांनी माल्यार्पण तर पुनम रायपुरे यांनी ध्वजारोहण करुन अभिवादन केले.
धम्मराजिका बुद्धविहार मारेगांव येथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण वसुमित्र वनकर व ओमप्रकाश पाटील यांनी केले त्यानंतर त्रिसरण पंचशील गाथा चे पठण करण्यात आले.
दरम्यान बालवक्ते स्वर्णित गौरव चिकाटे याने गाैतम बुद्ध यांच्या जीवनावर माहिती सांगितली.तो नेहमी विहारात भाषण व गायन करीत असतो.यावेळी वंचित बहुजन आघाडी मारेगाव यांचे द्वारा या चिमुकल्या बालवक्त्यास पुस्तक भेट देऊन त्याचे कौतुक करण्यात आले.
शब्दकार्यक्रमानंर अल्पोपहार व खिर वाटप करण्यात आली.सायंकाळी शहरातून मेनबत्ती रॅलीसह बुद्अभिवादन करण्यात आले.संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गाैरव चिकाटे यांनी केले.
सदर कार्यक्रमास जयभीम उत्सव समिती मारेगाव हेमंत नरांजे,गाैरव चिकाटे, वसुमित्र वनकर,ओमप्रकाश पाटील,सुदर्शन पाटील,विजय खाडे,बालू गजभीये नुतन तेलंग,रेखा काटकर,सपना वनकर, शोभा दारुंडे, मिना दिघाडे इत्यादीचे सहकार्य लाभले.




