– आग लागल्यास शेजारील तालुक्यावर अवलंबून
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यात कापसाचे जिनिंग व शेतमाल साठवणुकीचे गोदामासह अनेक संवेदन वस्तूची साठवणुक केल्या जाते. तालुक्यात बरेचदा आगीच्या घटनाही घडल्या आहेत. परंतू तालुक्यात आगीची घटना घडल्यास वेळेवर अग्निशामक मिळत नसल्याने शेजारील तालुक्यावर अवलंबून रहावे लागत असल्याने तालुक्याची सुरक्षा वाऱ्यावर आहे.
मारेगाव तालुक्याची निर्मीती होऊन चार दशकाचा कालावधी लोटला आहे. परंतू आजही तालुकास्तरावर अग्निशमन बंब उपलब्ध नाही. तालुक्यात कापसाचे मारेगाव येथे चार, तर मार्डी येथे दोन जिनिंग आहे. या ठिकानी कापसाच्या गाठीची निर्मीती केली जाते. धान्य खरेदी केल्यावर त्याची साठवणुक करायला शासकीय गोदाम आहे. तालुक्यात वितरित होणारे हजारो टन रेशनचे धान्य शहराच्या मध्य वस्तीत असलेल्या गोदामात साठविले जाते.
शहरात विविध बँका सह महत्वाची शासकीय कार्यालय आहेत. दोनतीन मजली नगरपंचायत व पोलिस वसाहत इमारती आहे. परंतू आगीची घटना घडल्यास या इमारती अग्निशमन यंत्राविना असुरक्षीत आहे.
तालुक्यात या पूर्वी आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहे. कापूस जिनिंग ला आग लागून करोडो रुपयाचा कापूस खाक झाला असुन व्यावसायिक प्रतिष्ठानांना आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
परंतू तालुक्यात अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याने आग विझविण्यासाठी वणी किंवा पांढरकवडा या दोन शहरावर अवलंबून राहावे लागते. ही वाहणे दाखल होई पर्यंत संपुर्ण बेचीराख झालेले असेल.
तालुक्यात दर वर्षी आगीच्या घटना घडत असताना प्रशासनाने आजतागाय अग्निशमन यंत्र खरेदी केले नाही. अनेक कार्यालयात भिंतीवर लटकवलीली अग्निशमन यंत्रे आहेत, परंतू ही यंत्रे देखभाली अभावी कुचकामी ठरत आहे.
नगरपंचायतची स्थापणा सन २०१५ झाली असुन या ८ वर्षांत नगरपंचायत अग्निशमन यंत्राची खरेदी करेल ही आशा होती. परंतू ८ वर्षात नगरपंचायतला अग्निशमन यंत्र खरेदी करण्यात अपयश आले आहे.




