– कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्रशासन सज्ज
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
आगामी काळात होऊ घातलेल्या बकरी ईद व गुरु पोर्णिमा या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांनी २८ जून रोजी मारेगाव पो.स्टे.ठाणेदार राजेश पुरी यांचे नेतृत्वात शहरातील मुख्य मार्गावरुन पथसंचलन करुन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची बाब अधोरेखित केली.
शहरात सण व उत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे करीता मारेगाव पोलीसांकडुन २८ जून रोजी शहरात पथसंचलन करण्यात आले.
मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी यांचे नेतृत्वात करण्यात आलेले पथसंचलन पोलीस स्टेशन पासून प्रारंभ होत आंबेडकर चौक, गौसिया मस्जिद,शहरातील जुनी वस्ती,नगरपंचायत,मार्डी रोड आदी मुख्यमार्गांवरून करण्यात आले.
सण,उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्रशासन सज्ज असल्याची बाब या पथसंचलनाने जनसामान्यांच्या मनावर कोरण्यात आली.




