लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुका विधी सेवा समिती व मारेगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 आगस्ट ला न्यायालय तर्फे कायदे विषयक माहिती असणाऱ्या विविध पुस्तिकांचे येथील मार्डी चौक मध्ये नागरिकांना वाटप करण्यात आले. यावेळी मारेगाव न्यायालयातील एड. मेहमूद पठाण, न्यायालय कर्मचारी श्री पांडुरंग वासाड, तसेच श्री. मोरेश्वर कणकुंटवार, श्री के. एम. जाधव व सागर मडावी हजर होते.
याचबरोबर आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त 12 आगस्ट ला शहरातील मुख्य बाजारपेठ व डॉ.आंबेडकर चौकात युवकांना, व नागरिकांना विविध कायद्याबद्दल पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
यावेळी मारेगाव न्यायालयातील ऍड.नितीन जुनघरे, ऍड. मेहमूद पठाण, ऍड.आशिष पाटील, ऍड. रुणाली गाणार, ऍड.मेघा कोडापे यांचे सह मारेगाव न्यायालयाचे कर्मचारी पांडुरंग वासाड , मोरेश्वर कणकुंटवार, एन.एन. जाधव व सागर मडावी यांनी सहकार्य केले.




