– तालुक्यात जनसंवाद यात्रेचा थाटात शुभारंभ
– अनेक दिग्गजांची उपस्थिती
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
“देशात सुरू असलेली भाजप सरकारची हुकूमशाही बंद करून जनसामान्यांशी चर्चा करून काँग्रेसचे विचार घराघरात पोहोचविणे हेच आमचे एकमेव उद्दिष्ट” असे उद्गार काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांनी जनामाय कासामाय मंदिर,वणोजादेवी येथे काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या शुभारंभा वेळी केले. यावेळी हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांसह अनेक काँग्रेस दिग्गजांची उपस्थिती होती.
आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.परिणामी काँग्रेसने जनसंवाद यात्रेची घोषणा केली आहे.यात मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीने आपली कंबर कसली असून आज ता .६ सप्टेंबरपासून मारेगाव तालुक्यात जनसंवाद यात्रेचा श्री गणेशा जनामाय कासामाय मंदिर, वनोजा देवी येथून करण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांनी या जनसंवाद यात्रेत काँग्रेसचे विचार घराघरात पोहोचविणे हे एकमेव उद्दिष्ट असून भाजप सरकारचा भ्रष्ट कारभार, महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि अन्य मुद्द्यांवर काँग्रेस द्वारा रान उठवलं जाणार असल्याचे सुतोवाच केले.

आजपासून सुरू झालेली ही जनसंवाद यात्रा सलग चार दिवस ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली असून ६ सप्टेंबर रोजी मार्डी सर्कल,७ सप्टेंबर रोजी कुंभा सर्कल,८ सप्टेंबर रोजी बोटोनी सर्कल तर ९ सप्टेंबर रोजी वेगाव सर्कलची भ्रमंती काँग्रेसचे शिलेदार करणार आहे.
या जनसंवाद यात्रेत शेतकऱ्यांवरील अन्याय, महिलांवरील अत्याचार, युवा वरील बेरोजगारीचे सावट, कामाविना मजुरांचे रिकामे हात आदी अनेक मुद्द्यांवर काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी जनतेशी ‘आय टू आय’ संवाद साधणार असुन अनेक मूक मुद्द्यांना वाचा फोडणार आहे.
जनसंवाद यात्रेच्या शुभारंभा वेळी काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार, जेष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे, राकेश खुराणा,मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मारोती गौरकार,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा, डॉ.लोढा,अंकुश माफुर यांचे सह सरपंच रविराज चंदनखेडे, तुळशीराम कुमरे, उपसरपंच प्रफुल्ल विखनकर, नगरसेवक आकाश बदकी, खालीद पटेल, उदय रायपुरे, समीर कुडमेथे, शाहरुख शेख, आकाश भेले, गौरव आसेकर,
यांचे सह शेकडो काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते,व हजारो नागरिक उपस्थित होते.




