— भरपाई मागणीसाठी जनहित कल्यान संघटनेचे सं.अध्यक्ष गौरीशंकर खुराणा आक्रमक
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी उपविभागातील मारेगाव तालूक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाढल्याने व अवकाळी पावसाने हैदोस घालत वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे, त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने घरगुती उपकरणे निकामी झाली. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करून झालेल्या नुकसानीला विद्युत वितरण जबाबदार असून, विद्युत वितरण ने नुकसानग्रस्तांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी यासाठी जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा यांनी विद्युत वितरण मारेगाव च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
मारेगाव तालूका हा आदिवासीबहुल असुन तालूक्यात शेतीशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. कुठलाही औद्योगिक विकास नसल्याने तालूक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहेत. मागील पाच वर्षांपासून सतत अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करत शेतकरी कसाबसा जीवन कंठत आहे. कर्जाचा बोझा असल्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण सुध्दा प्रचंड आहे. त्यामुळे नकाशावर मारेगाव तालूक्याची आत्महत्याग्रस्त तालूका म्हणून ओळख आहे.
ह्या सगळ्या संकटाचा सामना करुन जीवन जगत असतांना ता. १९ एप्रिल रोजी अस्मानी संकट कोसळले. वीज, वादळ, वारा, पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला. त्यामध्ये मोठमोठी झाडे उन्मळून पडली. तसेच विद्युत खांब वाकले. त्याचा परिणाम म्हणून विद्युत तारा तुटून पडल्या. विद्युत प्रवाह खंडित झाला. शेतकऱ्यांचे मोटारपंप व घरगुती विद्युत उपकरनाचे फार मोठे नुकसान झाले. यात शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकही भरडल्या गेले. त्यामुळे जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांचे सह तालूका जनहित कल्याण संघटनेचे पदाधिकारी आक्रमक होत नुकसान भरपाईची मागणी केली. वरिष्ठ अभियंता व अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. पीडितांना त्वरीत नुकसान भरपाईची मागणी रेटून लावली. त्या मागणीला दुजोरा देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अभियंता मारेगाव यांना आदेशित करुन नुकसान भरपाईचे पत्र काढण्यात आले. व नुकसान भरपाई देणार असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी नगर सेवक आकाश बदकी जनहित कल्याण संघटनेचे तालुकाध्यक्ष समिर कुडमथे, उपाध्यक्ष राॅयल सय्यद, नगर सेवक आकाश बदकी, गौरव आसेकर, यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मारेगाव तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे व घरगुती, व्यावसायिक ग्राहकांचे नुकसान झाले असल्यास उपविभाग महावितरण कार्यालय मारेगाव येथे अर्ज करण्याचे आवाहन गौरीशंकर
खुराणा यांनी केले.
विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असुन यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. विद्युत पुरवठा सुरळीत व नियमित रहावा यासाठी यापूर्वी आम्ही उपोषण सुध्दा केले आहे. त्यावेळी आश्वासन देण्यात आले होते मात्र अजुनही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. हा नाकर्तेपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही, प्रसंगी आंदोलन सुध्दा करु.
गौरीशंकर ओमप्रकाश खुराणा
संस्थापक अध्यक्ष, जनहित कल्याण संघटना,
सभापती, कृऊबा समिती मारेगाव.




