– मारेगावचा बायो कचरा ‘वे टु चंद्रपूर’ रेफर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
ग्रामीण रुग्णालयातून दररोज ‘बायोमेडिकल वेस्ट’ निघत असते. या बायोमेडिकल कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.परिणामी या वेस्ट कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता ‘बीएमडब्ल्यू मशीन’ रुग्णालयातच उपलब्ध आहे. तूर्तास ‘मारेगावची बीएमडब्ल्यू नादुरुस्त’ असून मारेगावचा ‘वेस्ट कचरा’ वे टू चंद्रपूर’ रेफर होत असल्याची माहिती रुग्णालयातून प्राप्त झाली आहे.
तालुक्यातील एकमेव रुग्णालय असलेले मारेगावच्या ग्रामीण रुग्णालयातून दररोज बायोमेडिकल वेस्ट कचरा निघत असतो.यात काच, सलाईनच्या बॉटल,सिरींज ,आय वी सेट तसेच रुग्णालयातील इतरही वेस्ट साहित्य सांगता येईल.
या धोकादायक कचऱ्याची विल्हेवाट रुग्णालयातच लावण्याकरिता बीएमडब्ल्यू यंत्र रुग्णालयात उपलब्ध आहे.परंतु सद्यस्थितीत हे यंत्र नादुरुस्त असल्याने रुग्णालयातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट चंद्रपूर येथील ‘सुपर हायजिनिक’ कंपनीला दिले असल्याची माहिती रुग्णालयातून प्राप्त झाली आहे.
परिणामी रुग्णालयातच ‘बीएमडब्ल्यू’ यंत्र उपलब्ध असूनही आउटसोर्सिंग कंपन्यांचे चांगले दिवस आल्याचे विदारक वास्तव दिसून येत आहे.
रुग्णालयात बीएमडब्ल्यू मशीन आलेली आहे.परंतु ती नादुरुस्त अवस्थेत आहे. मशीन सुरू ठेवण्याकरिता उच्च दाबाचा विद्युत पुरवठा आवश्यक असल्याने त्याचा परिणाम रुग्णालयातील इतर विद्युत उपकरणांवर होत होता.तूर्तास चंद्रपूर येथील एका कंपनीस सदर वेस्ट कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट दिले आहे.त्यांची गाडी नियमित येऊन रुग्णालयातील वेस्ट कचरा घेऊन जात असते. रुग्णालयातील वेस्ट कचऱ्याची विल्हेवाट लावणे तसे धोक्याचे काम आहे. यामुळे परिसरात प्रदूषण होण्याचा धोका कायम असतो. सदर कंपनीचा चंद्रपूरला प्लांट असल्यामुळे या वेस्ट कचऱ्याची तिथे योग्य पध्दतीने विल्हेवाट लावली जाते.
डॉ.धात्रक,
वैद्यकीय अधीक्षक,ग्रामीण रुग्णालय मारेगाव.




