– सुदैवाने जीवितहानी टळली
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील बोटोणी येथील प्रवासी निवारा वादळी वाऱ्याच्या तडाक्यात जमीनदोस्त झाल्याची घटना ३० एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेदरम्यान घडली. यात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी प्रवासीनिवाऱ्या शेजारी उभी असलेल्या एका पाणीपुरी चालकाच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे.
उन-पावसा पासून प्रवासी सुरक्षित रहावे याकरिता बोटोनी येथे १९७३ रोजी प्रवासी निवारा उभारण्यात आला होता. गेली ५० वर्ष येथील प्रवासी निवारा प्रवाशांच्या सेवेत तत्पर होता.
दरम्यान ३० एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजे दरम्यान जोरदार वादळी वाऱ्याने सदर प्रवासी निवारा कोलमडून पडला.
यात प्रवासी निवाऱ्यात आश्रय घेत उभे असलेले काही प्रवासी थोडक्यात बचावले असले तरी प्रवासी निवाऱ्या शेजारी उभी असलेली एका पाणीपुरी चालकाची दुचाकी प्रवासी निवाऱ्या खाली आल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले असुन पान टपरी व ऑनलाईन काम करणाऱ्या एका दुकानाचेही किरकोळ नुकसान झाले आहे.





