– बी.फार्मसी सीजीपीए परीक्षेत डंका
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
राळेगाव तालुक्यातील किन्ही (जवादे) येथील कु.कोमल शंकर मांदाडे हि विद्यार्थिनी बी.फार्मसी सीजीपीए परीक्षेत ८.५० % गुण घेत उत्तीर्ण झाली.ग्रामीण भागातील कन्येने प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन मिळवलेले हे दैदिप्यमान यश भल्याभल्यांना भुरळ घालणारे असुन कोमल कौतुकास पात्र आहे.
कोमल ही मुळची किन्ही (जवादे) येथील असून ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी रायगड लोणेरे विद्यापीठामार्फत जगदंबा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च,कळंब येथे अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती.
दरम्यान बी.फार्मसी सीजीपीए परीक्षेत कोमलने पदवीच्या अंतिम वर्षाला ८.५०% गुण घेत राळेगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. विशेष म्हणजे कोमलची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.परिणामी कोमलचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोमलने आपल्या दैदीप्यमान यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक प्राचार्य,प्राध्यापक यांना दिले आहे.





