– किन्ही (ज) सह अवघा परिसर शोक सागरात
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे येथील जवादे परिवारातील ज्येष्ठ सदस्य, माजी सरपंच तथा सरपंच सुधीर जवादे यांचे काका, किन्ही गावासह अवघ्या परिसरात बापू म्हणून सुपरीचित असलेले हरिदास बापु जवादे यांचे १४ ऑक्टोंबर रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यू समयी ते ८६ वर्षाचे होते.
राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे येथील हरिदास बापू जवादे हे जवादे परिवारातील ज्येष्ठ सदस्य.कुणाच्याही मदतीला एका हाकेने धावून जाणारे हरिदास बापू म्हणजे पंचक्रोशीतील लाडके व्यक्तिमत्व.
सतत चेहऱ्यावर हास्य असणाऱ्या हरिदास बापू यांनी दोन वर्ष आधी आपल्या अर्धांगिनी निशा ताई जवादे यांना कायमचे गमावले होते.गत काही दिवसापासून त्यांची प्रकृतीही बरी नव्हती.
दरम्यान १४ ऑक्टोंबर रोजी दुपारी हरिदास बापू यांच्या किन्ही जवादे येथील राहते घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.आपले लाडके बापू कायमचे गमावल्याने किन्ही सह अवघा परिसर यावेळी शोकसागरात बुडाला.
मृतक हरिदास बापू जवादे यांची अंतीम यात्रा उद्या १५ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता किन्ही येथील सरपंच सुधीर जवादे यांच्या निवासस्थानावरुन निघणार असुन किन्ही जवादे येथील स्मशानभूमीत त्यांचे पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.





