लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगाव…..
वणी यवतमाळ राज्यमार्गावरील मारेगाव पासून थोड्या अंतरावर असलेल्या करणवाडी नजीक दुचाकीचा अपघात झाल्याची घटना ता. २५ जानेवारी रोजी १.४५ वाजेदरम्यान घडली असून अपघातात एक इसम गंभीर जखमी आहे.
वणी यवतमाळ राज्यमार्गावर ता. २५ जानेवारी रोजी दुपारी १.४५ वाजेदरम्यान वागदरा येथील संतोष नथ्थू भोयर वय अंदाजे ३५ हे त्यांच्या दुचाकीने मारेगांव येथे येतांना करणवाडी नजीक त्यांची दुचाकी स्लिप होऊन संतोष हे दुचाकी वरुन पडले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याची माहीती जनहित कल्याण संघटनेचे मारेगांव तालूका उपाध्यक्ष राॅयल सय्यद यांना मिळताच, मयुर मसराम व इब्राहिम शेख या दोन सहकार्यांसह जनहित कल्याण संघटनेची रुग्णवाहिका घेवून घटना स्थळी पोहचत अपघातग्रस्त संतोष यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
वृत्त लिहिस्तोवर संतोष यांचेवर मारेगांव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु होते.
