– वणी येथे आदिवासी एकता महोत्सव
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी येथील बाजोरीया हॉल येथे बिरसा ब्रिगेड, वणी तालुक्याच्या वतीने “आदीवासी एकता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यात एकशे एक कला अवघत करणारे साहित्यिक तथा वणी न्युज एक्स्प्रेसचे संपादक विनोदकुमार आदे यांचा बिरसा ब्रिगेड वणी तालुक्याच्या वतीने समाज भुषन पुरस्कार देऊन त्यांना गौरव करण्यात आला.
गत पंधरा वर्षापासून विनोद आदे वणी उपविभागात समाजासाठी राबत आहे. मारेगांव येथे बिरसा मुंडाचे तैल चित्राच्या स्थापने करीता व तसेच रंगवण्या पर्यंत त्यांचे अमूल्य योगदान आहे. क्रांतिवीर बिरसा मुंडा ह्या नाट्य प्रयोग मारेगांव येथे जुन्या आयटीआय मैदानावर घेण्याकरीताही विनोदकुमार यांचा मोलाचा सहभाग होता.
श्री गुरुदेव सत्संग सेवा समिती द्वारेही चौकाचौकात पाणपोई लाऊन, विर बिरसा मुंडा जयंतीच्या शुभेच्छाचे स्वता बनवलेले बॅनरही चौकाचौकात मारेगांवकरानी प्रत्यक्ष अनुभवले वणी येथे बिरसा ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यक्रमात विनोदकुमार निशुल्क रांगोळीत विर बिरसामुंडाचे हुबेहुब चित्र साकारून कार्यक्रमात रंगत आणण्यासाठीही विनोदकुमार नेहमीच तत्पर राहीला अश्या निस्वार्थी व्यक्तीमत्वाचा बिरसा ब्रिगेडच्या वतीने समाज भुषन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी. डाॅ संचिता नगराळे, रमेशभाऊ कुळमेथे कवी,
राष्ट्रवादीचे विजय नगराळे, अॅड एल. के मडावी, बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डाॅक्टर अरविंद कुळमेथे, डाॅ. अभिलाषा बेहेरे- गावतुरे प्रा. वसंत कनाके, आदिवासी साहित्यीक यवतमाळ,ब्राह्मणनंद मडावी कवी साहित्यिक मुल,निळकंठजी जुमनाके, देविदास चांदेकर, डाॅ. गजानन मेश्राम, आनंदरावजी आत्राम सुभाषजी आत्राम, वंचीतचे दिलीप भोयर संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे, वंचितचे मंगलजी तेलंग, लढाचे प्रविण खानझोडे कैलास आत्राम, हरिभाऊ रामपुरे ,बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुधाकर चांदेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.





