– श्री.जगन्नाथ महाराज विद्यालयात प्रशिक्षणार्थी गिरवणार कौशल्याचे धडे
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
पुजा मडावी (वासरीकर) : मारेगाव
ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने ग्रामीण भागात ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास’ हा बहुआयामी कार्यक्रम राबविला जात आहे.ता.१९ ऑक्टोबर रोजी वेगावातील श्री.जगन्नाथ महाराज विद्यालयात ‘कौशल्य विकास केंद्राचे’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थी आता श्री.जगन्नाथ महाराज विद्यालयात कौशल्याचे धडे गिरवणार आहे.या उद्घाटन कार्यक्रमास औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मारेगाव येथील स्टाफ,प्रमुख पाहुणे व गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

‘कौशल्य युक्त महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्र’ या अभियाना अंतर्गत महाराष्ट्रात ५११ स्व.प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन ता.१९ आॕक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते आभासी पध्दतीने करण्यात आले.यात यवतमाळ जिल्ह्यातील २० केंद्रापैकी मारेगाव तालुक्यातील वेगावात सदर केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा वेगाव येथील सरपंचा सौ.उषा देरकर होत्या.प्रमुख मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते माधव कोहळे तर मंचावर भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे,जेष्ठ नेते शशिकांत आंबटकर,मालाताई गौरकार,नरेश वाघमारे,मधुकर टोंगे,भाऊराव थेटे, मारेगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिर्देशक जे.एन.गड्डमवार, अनिल डफळे,गुल्हाणे,सौ. बऱ्हाटे, कु.उइके, कु.मडावी, कु.गाणार, मिलमिले, गोहोकार, टोंग,उमरे, नंदा ताई आदी शिक्षक वृंद तसेच कर्मचारी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शेकडो प्रशिक्षणार्थी हजर होते.

कार्यक्रमाचे सुञसंचालन तथा प्रास्ताविक कु.भाग्यश्री मेश्राम यांनी तर आभार कु.संहीता गाणार यांनी मानले.

कार्यक्रमाचे संपुर्ण आयोजन ट्रुली युवर्स वेलफेयर सोसायटी यवतमाळचे संदीप दुबे यांनी तर सहकार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कोपा ट्रेड प्रमुख कु.मडावी यांनी केले.




