— तालूका भारतीय जनता पक्षाचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीन योजना राबविण्यात येत असुन या योजनेचा लाभ तालुक्यातील माता भगीनिंना मिळावा तथा पैशाच्या अडचणीमुळे लाभापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी, भारतीय जनता पक्षाच्या वतीने ऑनलाईन सेवा केंद्र ता, १९ जुलै रोजी सुरु करण्यात आले असुन या मोफत ऑनलाईन सेवा केंद्राचे उद्घाटन वणी विधान सभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते तथा तालूका अध्यक्ष अविनाश लांबट, माजी अध्यक्ष, ज्ञानेश्वर चिकटे, ता.सरचिटणीस प्रशांत नांदे, शहराध्यक्ष अनुप महाकुलकर यांचे उपस्थितीत करण्यात आले.
राज्य सरकारकडून आतापर्यंत अनेक योजना राबविण्यात आल्या व येत आहेत. मात्र आता राज्य सरकारच्य लाडकी बहीन योजनेंतर्गत पात्र बहिनींना दरमहा १५०० रुपयाचा लाभ होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज माहीतीसह भरणे आवश्यक असुन अशा अनेक माता भगीनी ऑनलाईन केंद्रावर आर्थिक विवंचणेमुळे अर्ज दाखल करु शकत नसल्याने, या महत्वकांक्षी योजनेपासुन कोणतीही भगीनी वंचित राहु नये या उदात्त हेतुने मारेगाव तालूका भारतीय जनता पक्षाच्या वतीने, निशुल्क ऑनलाईन सेवा केंद्र सुरु करण्यात आले असुन, ता. १९ जुलै रोजी वणी विधान सभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते निशुल्क सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, ता. सरचिटणीस प्रशांत नांदे, पवन ढवस, शहराध्यक्ष अनुप महाकुलकर, सौ. शालिनी दारुंडे, नगरसेवक राहुल राठोड, डोमाजी भादीकर, मारोती तुराणकर, सुनिल देवाळकर, जगदीश ठेंगणे, दुष्यंत निकम यांचेसह आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, तथा महिलांची विशेष उपस्थिती होती.
नोंदणीसाठी कुणालाच पैशे देऊ नका…!
महाराष्ट्र शासनाने नुकतीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली असुन, पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन केंद्रावर महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. काही केंद्रधारक महिलांकडून पैसे सुद्धा आकारत असल्याची माहिती मिळत आहे. म्हणून हे मोफत ऑनलाईन सेवा केंद्र सुरु करीत आहो. या मोफत केंद्रातूनच योजनेची नोंदणी करावी. व कुणालाच पैशे देऊ नका.
आमदार, संजीव रेड्डी बोदकुरवार,
वणी विधान सभा क्षेत्र.




