– शिवसेनेचे (उ.बा.ठा.) महावितरण अभियंत्यांना निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शहरी व ग्रामीण भागातील न सांगता खंडीत होणारा वीज पुरवठा तात्काळ थांबवा या प्रमुख मागणीसह विविध मागण्या संबंधीचे निवेदन २० ऑक्टोबर रोजी शिवसेना (उ.बा.ठा.) तालुकाध्यक्ष संजय आवारी यांचे नेतृत्वात महावितरण उप अभियंत्यामार्फत अभियंत्यांना दिले.सात दिवसाचे आत सदर प्रश्न निकाली न लावल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे.
मारेगाव तालुक्यात गत काही दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू आहे.शेती पिकांना पाण्याची नितांत गरज असताना महावितरण कडून वेळी अवेळी वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने बळीराजा पुरता मेटाकुटीस आला आहे.
दरम्यान ता.२० ऑक्टोबर रोजी शिवसेनेचे (उ.बा.ठा.) तालुकाध्यक्ष संजय आवारी यांचे नेतृत्वात असंख्य शिवसैनिकांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी विविध मागण्या संबंधीचे निवेदन वीज वितरण उप अभियंत्यामार्फत कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.
यात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या शेत पंपांना दिवसा विज पुरवठा करण्यात यावा, शहरी व ग्रामीण भागात न सांगता खंडित होणारा वीज पुरवठा तात्काळ थांबवावा,नादुरुस्त वीज रोहित्रांची दुरुस्ती करण्यात यावी, किंबहुना गरज असल्यास नवीन रोहित्र बसवावे, आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या.७ दिवसाचे आत सदर निवेदनाची दखल न घेतल्यास गंभीर आंदोलन छेडु असा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख (उ.बा.ठा.) संजय आवारी यांचेसह ब्रम्हदेव जुनगरी,युवा सेना तालुका प्रमुख मयूर ठाकरे, सुनील गेडाम,राजु मोरे, गणेश आसुटकर यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.




