– मारेगाव तालुक्यातील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील शिवनाळा बस थांब्यानजिक एका पायदळ जाणाऱ्या होतकरू मजूर युवकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युवक घटनास्थळीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना ३० जून रोजी रात्री १० वाजेदरम्यान घडली.
अनिल कृष्णराव टेकाम (२७) रा.शिवनाळा असे अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या मजूर युवकाचे नाव असून ते मिस्त्री काम करत असल्याची माहिती आहे.
दरम्यान ३० जून रोजी रात्री १० वाजेदरम्यान अनिल हे मारेगाव येथून मिस्त्री काम आटपून शिवनाळा येथे पायदळ जात होते.यावेळी शिवनाळा येथील बस थांब्या नजीक अनिल यांना एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिली.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.अनिल यांना धडक देताच अज्ञात वाहनाने घटनास्थळावरून पोबारा केला.
अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अनिल यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
मृत अनिल यांचे पश्चात आई,एक विवाहित बहीण असल्याची माहिती आहे.घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत.
