– प्रसिद्ध हवामान अंदाजक पंजाबराव डख यांचा अंदाज
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : प्रफुल्ल ठाकरे
एकीकडे तापमानात दिवसेंदिवस वाढ होऊन उन्हाचे चटके बसत असताना ऊन-सावलीच्या खेळात अवकाळी पावसाची “बॅटिंग” पुढील आठ ते दहा दिवस सुरू राहणार असल्याचा अंदाज प्रसिद्ध हवामान अंदाजक पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे.
गेल्या काही दिवसा पासून शहरासह परिसरात अवकाळीची ये-जा अखंडित सुरू आहे.एकीकडे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असताना दुसरीकडे अवकाळीच्या सरी रोजच कोसळत असल्याने दुहेरी संकट ओढवले असल्यागत भास होतो आहे.
दरम्यान पुढील आड ते दहा दिवस वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज प्रसिद्ध हवामान अंदाजक पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे.
नागरिकांनी विशेषतः शेतकरी बांधवांनी सजग राहुन शेतीच्या कामांचे नियोजन करण्याची आवश्यकता असुन आपल्या पशुधनाची योग्य काळजी घेण्याची गरज आहे.




