— शैक्षणिक क्षेत्रातील युवा नामवंत संजय काकडे यांचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
राळेगाव तालुक्यातील किन्ही (जवादे) येथे ता. १० ऑगस्ट रोजी, साई पॉलीटेक्नीक वर्धापन दिन तथा शैक्षणिक क्षेत्रातील युवा नामवंत संजय काकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, साई पॉलीटेक्नीक, किन्ही जवादे तथा दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था, सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने किन्ही जवादे येथील साई पॉलीटेक्नीक मध्ये सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजुंनी या आरोग्य शिबीराचा लाभ घेण्याचे, आयोजक संजय काकडे यांनी आवाहण केले आहे.
राळेगाव तालुक्यातील किन्ही (जवादे) १५०० च्यावर लोकसंख्या असलेले गाव राष्ट्रीय महामार्गापासून अंदाजे १ कि.मी. अंतरावर वसले असुन गावलगत अनेक छोटे खेडे सुध्दा आहेत. गाव पाड्यांवर वास्तव्य असलेल्या नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. औद्योगिकदृष्ट्या वंचित असलेल्या तालुक्यात शेतीपुरक व्यवसायाची सुध्दा वानवा असल्याने सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण सुध्दा आहे.
मागील सात आठ वर्षापासुन शेतकरी शेतमजुर हा निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकून निसर्गाच्या असमतोलपणामुळे शेती व्यवसाय डबघाईस आला असुन यावरच उदरनिर्वाह असल्याने आर्थिक विवचणा सतत पाठीसी आहे. त्यामुळे कुटुंब, घरातील कार्य व आरोग्यावर खर्च करणे ही तारेवरची कसरत ठरत असल्याने किन्ही जवादे येथील युवा उद्योजक, शैक्षणिक क्षेत्रातील युवा नामवंत तथा, स्व.अहिल्याबाई काकडे बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय काकडे यांच्या, पुढाकारातून किन्ही जवादे येथे ता.१० ऑगस्ट रोजी, साई पॉलीटेक्नीक वर्धापन दिन तथा संजय काकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, साई पॉलीटेक्नीक, किन्ही जवादे तथा दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था, सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने किन्ही जवादे येथील साई पॉलीटेक्नीक मध्ये सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसाचा ताप, हदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे इ.व डोळ्यांचे सर्व आजार, मोतियाबिंदु शस्त्रक्रिया, तिरळेपणा तथा वृध्दांना चश्मे वाटप करण्यात येणार असल्याने या आरोग्य शिबीराचा गरजुनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक संजय काकडे यांनी केले आहे.
