— नवरगाव येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
नवरगाव येथील एका ३१ वर्षीय युवकाने घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना ता.३१ मे रोजी सकाळी ११:३० वाजता उघडकीस आली.
आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव शुभम तुळशीराम करलुके, (३१) आहे. नवरगाव येथे वास्तव्यास असून मजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. शुभमच्या आईच्या नावे घरकुल मंजूर झाल्यावर त्यांनी आपले घराचे बांधकाम करणार असल्याने बाजूच्या घरी भाड्याने राहत होते. आई काही कामानिमित्त बाहेर गावला गेली होती. शुभम आणि त्याचा भाऊ हे दोघे घरी होते. आई नसल्याने शुभमचा भाऊ हा नळावर पाणी भरण्यासाठी गेला होता. अशातच शुभमने जुन्या घरी डिशच्या केबलने गळफास घेत आत्महत्या केली. सदर घटना सकाळी ११:३० वाजता उघडकीस आली.
शुभम हा अविवाहित होता. शुभमने आत्महत्या का केली हे अजूनही स्पष्ट नाही. शुभमचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला होता.शुभमच्या पश्चात आईवडील, भाऊ, विवाहित बहीण असा आप्त परिवार आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.




