♦पुढील एक वर्षात सालेभट्टी येथील मुलींच्या लग्नासाठी देणार एकवीस हजार रुपये
∗लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
तालुका स्थळापासुन जवळच असलेल्या सालेभट्टी येथे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथीनिमित्त दोन दिवसिय समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ता.११ व १२ मार्च रोजी करण्यात आले होते. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुक्यात सध्या समाजसेवेचे स्वप्न उराशी बाळगून गोरगरीब जनतेला सर्वतोपरी मदत, आरोग्य सेवा, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत, रुग्णाना आर्थिक मदत, तथा शेतकरी शेतमजुरांच्या हिताची कामे करुन जनमानसात ठसा उमटविणारे जनहित कल्यान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांचा जन्मदिनी अभीष्टचिंतन चिंतन सोहळा घेण्यात आला.
या प्रसंगी जनहित कल्यान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांनी ११मार्च २३ ते ११ मार्च २०२४ या एक वर्षाच्या कालावधीत सालेभट्टी येथील ज्या ज्या मुलींचे लग्न होतील त्यांना २१ हजार रुपये रोख देणार असल्याचे सांगुन सालेभट्टी येथील ग्रामस्थांना सुखद धक्का दिला. यावेळी ग्रामस्थांच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद पहायला मिळाला.

“कुणी निंदा कुणी वंदा” याप्रमाणे समाज सेवेचा वसा व ध्यास घेतलेल्या जनहित कल्यान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांच्या आठ महिन्याच्या कार्याचा आलेख पाहता दिवसागणिक उंचावत आहे. सततचा ओला कोरडा दुष्काळ, त्यामुळे आर्थिक विवंचणेतुन होणाऱ्या आत्महत्या, या विषयाला हात घालत अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबांना “खारीचा वाटा” उचलत मदत, घसरलेल्या आरोग्य सेवा, यासाठी रुग्ण वाहीका देत सर्व सामान्यांच्या खिशाला लागणारी कात्री कमी केली.अनेक रुग्णांना आर्थिक मदत, तथा सांस्कृतिक कार्यक्रम, यासारख्या कार्यक्रमास मदत देवुन त्यातच समाधान शोधुन, सामाजिक कार्याला अग्रक्रम देत जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांनी आता तालुक्यातील खेळाडुप्रती असलेली ओढ व क्रीडा संकुला अभावी खेळाडुंची होत असलेली ओढातान लक्षात घेउन शहरी भागासह ग्रामीण भागातील खेळाडुंसाठी “जनहित कल्याण स्पोर्टिंग क्लबची” स्थापणा केली.
याच सोबत सालेभट्टी येथील जे गरीब कुटुंब आहे त्या कुटुंबातील मुलीचे लग्न करायचे असल्यास मार्च २०२३ते मार्च २०२४ पर्यंत मुलीच्या लग्नासाठी २१ हजार रुपये रोख देणार असल्याने हा जनहित कल्यान संघटनेच्या नविन उपक्रमामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम मोझरी र.नं. १६२ द्वारा संचलित शाखा सत् गुरू जगन्नाथ बाबा महिला भजन मंडळ सालेभट्टी येथे भव्य समाज प्रबोधन मेळावा व क्रांतिवीर शामा दादा कोलाम यांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली. ता. १२ रोजी ग्राम सफाई पासुन तर सामुदायिक प्रार्थना पर्यतचे संपुर्ण कार्यक्रम घेत पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी जनहित कल्यान संघटनेचे पदाधिकारी, सदस्य तथा सालेभट्टी व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
|





