♦नागरिकांना मिळणार “विनोदाचा फुल्ल डोज”
♦लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
जनतेच्या हितासाठी सदैव जनसेवेत तत्पर असलेले जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराना यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्या शनिवारी सुप्रसिद्ध बाल कीर्तनकार ह.भ.प.चैतन्य महाराज राऊत (आळंदी दे.) यांच्या तुफान कॉमेडी कीर्तनाचे आयोजन मारेगाव न.प.च्या प्रांगणात सायंकाळी सहा वाजता करण्यात आले आहे.

कुठलाही राजकीय वारसा नसताना तालुक्यातील तरुणाईला सोबत घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा विडा उचलणारे,सर्वांचे लाडके जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जनहित कल्याण संघटना,जनहित कल्याण महिला संघटना,जनहित कल्याण युवा स्पोर्टिंग क्लब मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या ता.११ मार्च रोजी नगरपंचायत मारेगावच्या भव्य प्रांगणात सुप्रसिद्ध बाल कीर्तनकार ह.भ.प.चैतन्य महाराज राऊत (आळंदी दे.) यांच्या तुफान विनोदी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सदर विनोदी कीर्तनातुन जनजागृतीसह “हास्याचा फुल्ल डोज”मिळणार असून शहरासह तालुक्यातील नागरिकांनी या तुफान विनोदी कीर्तनाचा मनसोक्त आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.





