– औचित्य…टेनिस बाॅल क्रिकेट यवतमाळ जिल्हा सचिवांचा वाढदिवस
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
टेनिस बाॅल क्रिकेट यवतमाळ जिल्हा सचिव गौतम जीवने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नॅशनल खेळाडू व राज्यस्तरीय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करीत वणी मारेगाव तालुक्याची मान उंचावली. त्यामुळे या खेळाडुंचा सन्मान व सत्कार सोहळा ता.१२ जुन रोजी सायंकाळी ६ वाजता वाघोबा खंडोबा हॉल ग्राउंड च्या मागे पोलीस स्टेशन कॉर्टरच्या बाजूला, वणी येथे आयोजित करण्यात आला आहे.
सन्मान व सत्कार सोहळा यवतमाळ जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यवतमाळ जिल्हाध्यक्ष, तथा जनहित कल्याण संघटना संस्थापक अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगांव सभापती गौरीशंकर खुराना यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात येणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार जी कैथवास, प्रो. विक्की पेटकर, रवींद्र पोटे, सदस्य, ग्रा.प. बोरी खुर्द तथा अखिल भारतीय सरोदे समाज संघटना विदर्भ प्रांत सचिव अंकुश माफुर, समाज सेवक राम सिडाना, असणार आहेत.
सत्कार व सन्मान सोहळा उपाध्यक्ष य.जी.टे.बॉ.क्री.अ.प्रितेश लोणारे, फाउंडर मेंबर य.जी.टे. क्री. अ.संदीप दुपारे,फाउंडर मेंबर य.जी.टे. क्री.अ. निलिमा उमरे, उपाध्यक्ष जी.पी.टे. बॉ. क्री.अ.अविनाश उईके,अध्यक्ष मा.टे. क्री.अ.तथा सचिव जनहित कल्याण संघटना निलेश तेलंग, सचिव.मा.टे.क्री.अ.तथा अध्यक्ष जनहित कल्याण संघटना समीर कुडमेथे,उपाध्यक्ष. जनहित कल्याण संघटना मारेगाव रॉयल सय्यद, शाहिद शेख (फाउंडर मेंबर जी.पी.टे. बॉ. क्री. अ) भरत लोहकरे (फाउंडर मेंबर जी.पी.टे. बॉ.क्री.अ),अविनाश तेजे (फाउंडर मेंबर जी.पी.टे. बॉ. क्री.अ),योगेंद्र शेंडे सचिव नवरंग क्रीडा मंडळ वणी,कर्मा तेलंग मॅडम संस्थापिका सक्षम बहुउद्देशीय संस्था यांचे विशेष उपस्थितीत होणार आहे.
दरम्यान या सत्कार व सन्मान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.






