– बोरी (बु) येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील बोरी (बु) येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात आला.यावेळी सेवानिवृत्त सैनिक बंडु सिडाम यांचे हस्ते झेंडा वंदन करून त्यांचा व देश सेवेत कार्यरत असलेले मयूर मंगेश खोंडे यांचा सत्कार करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता होत असताना १५ ऑगस्ट रोजी अवघ्या तालुक्यात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दरम्यान तालुक्यातील बोरी (बु) येथे १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत प्रांगणात सेवानिवृत्त सैनिक बंडू सिडाम यांचे हस्ते झेंडावंदन करण्यात आले. झेंडावंदनानंतर माजी सैनिक बंडू सिडाम तसेच देशसेवेत कार्यरत असलेले मयूर मंगेश खोंडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोरी (बु) येथील सरपंच प्रविन नान्ने, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी अध्यक्ष व सदस्य तसेच बोरी (बु) जि .प. शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक यांचे सह विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते.





