– काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर यांचा वाढदिवस ३ ऑगस्ट रोजी स्थानिक खालीद पटेल यांचे प्रतिष्ठानात साजरा करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर यांचा मित्र वर्ग मोठा आहे.आज अनिल देरकर यांचा वाढदिवस असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
स्थानिक खालीद पटेल यांचे फर्निचरचे प्रतिष्ठानात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत अनिल देरकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारोती गौरकार,नगरपंचायतचे माजी नगरसेवक खालीद पटेल,काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष शाहरुख शेख, उदय रायपुरे,सय्यद समीर, जुनेद पटेल, हंसराज तेलंग, योगेश महाडुळे, मोहन शेंडे,महादेव देवाळकर, विलास धानकी आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.




