• पाण्यासाठी कोसारा येथील नागरीकांचा आर्त टाहो
• माजी सरपंच नन्नावरे करत आहे टँकर द्वारे पाणीपुरवठा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क
कोसारा येथे ता. ३० मार्च ला रात्री ७.२० वाजेदरम्यान चक्रीवादळ सदृश्य सोसाट्याच्या वाऱ्याने व पावसाने अक्षरशः झोडपुन काढत विजेच्या रोहीत्रासह विद्युत खांब खाली पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे पाण्यासाठी नारीकांची ससेहोलपट होत असतांनाच माजी सरपंच पांडुरंग नन्नावरे यांनी नागरीकांची होणारी फरफट लक्षात घेत स्वतःच्या टँकरने माढेळी येथुन रात्री पासुन पाणी पुरवठा सुरु केला आहे.

३० मार्च रोजी कुणालाही अंदाज नव्हता की एवढे भयानक वादळ व पाऊस येईल. परंतु निसर्गापुढे कुणीही मोठा नाही हे झालेल्या वादळामुळे लक्षात येते. तसही मागील पाच सहा वर्षापासुन मारेगाव तालुका सातत्याने निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी शेतमजुर घायकुतीस आला आहे.
कोसारा हे गाव तालुक्यातील अंतीम टोकावर वर्धा नदीतीरी वसले असुन सावंगी, कोसारा, चिंचमंडळ, शिवणी व अन्य गावांना मागील काही वर्षांपासून पुराचा फटका बसत आहे. परंतु आता मात्र उन्हाळ्याची सुरुवात होत असतानाच कोसारा सावंगी या गावांना ता. ३० मार्च रोजी रात्री ७.२० दरम्यान भयानक आलेल्या वादळ व पावसाचा फटका बसला आहे. या वादळात मोठमोठी वृक्ष, घरावरील छप्पर, विद्युत रोहीत्र विजेचे खांब खाली पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेक कामे अडली असुन जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न नागरीकांना भेडसावत आहे.

मात्र याच दरम्यान पाण्याचा प्रश्न गंभीर होणार नाही व गावातील लोकांना पाणी मिळाले पाहीजे, ही गंभिर बाब कोसारा येथील माजी सरपंच पांडुरंग नन्नावरे यांच्या लक्षात येताच त्यानी सेवाभाव जोपासत गावातील विद्युत पुरवठा खंडित असल्याने, ता. ३१ मार्च ला रात्री पासुन माढेळी येथुन टँकर द्वारे पाणी पुरवठा सुरु करुन नागरीकांची तृष्णा भागवीत आहे.
मेन लाईनचे बारा खांब पडले आहेत. कोसारा येथील विद्युत रोहीत्रासह काही खांब पडले. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह, १०-१२ कामगार युध्दपातळीवर काम करत आहेत. या दोन दिवसात किंवा अगोदर ही काम पुर्ण करुन विद्युत पुरवठा सुरळीत करु.
पवण गीरी, सहाय्यक अभियंता,
विद्युत वितरण, वडकी.
