– गुरुपोर्णिमा उत्सव जल्लोषात साजरा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गुरुप्रतिमा,पादुकांचे पूजन, भक्तिगीते,भजन,गुरूचे महत्त्व सांगणारी प्रवचने आणि व्याख्याने अशा विविध उपक्रमातून शहरात सोमवारी गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी साई मित्र परिवारांने काढलेल्या रॅलीत साईंच्या जयघोषात मारेगाव नगरी दुमदुमली होती.
गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधत येथील साई मित्र परिवाराचे पुढाकाराने ता.२ जुलै रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तर सायंकाळी सोपान दादा कनेरकर यांचे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील प्रभाग क्रमांक ८ येथील साईबाबा मंदिरात साईबाबांचे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.३ जुलै रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी साई मित्र परिवाराचे पुढाकाराने शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रचंड रोषणाईच्या संगतीत संपूर्ण मारेगाव नगरी साईंच्या नामात दुमदुमल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले.
यावेळी साई मित्रपरिवार मारेगाव यांचे सह शहरातील शेकडो नागरिकांची तसेच साई भक्तांची उपस्थिती होती.




