– अतिवृष्टीमुळे शेतीकामे ठप्प
– शेतकऱ्यांमध्ये धाकधुक
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मागील चार दिवसांपासून तालुक्यात रिमझिम व पीकास पोषक पाऊस सुरु असतानाच मात्र ता.१८ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत कुंभा व वनोजा (देवी) महसुल मंडळात ४७६ हेक्टर मधिल पीकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे मागील वर्षीची आठवण करत शेतकऱ्यांमध्ये धाकधूक असुन शेतीकामे पावसामुळे ठप्प झाली आहेत.
तालुक्यामध्ये मागील वर्षी सलग १३ दिवस पावसाची रिपरिप तर कधी मुसळधार सुरु होता. त्यामुळे तालुक्यातील नदी नाल्यांना महापुर होत हजारो एकरातील शेत पीके खरडून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता.
तालुक्यातून वाहणारी जिवनदायीनी वर्धा नदीने रौद्ररूप धारण करत अनेक गावाना वर्धा नदी व नाल्यांचा विळखा पडुन गावात पाणी शिरल्याने निवाऱ्याचा प्रश्न सुध्दा उभा ठाकला होता. ती तारीख सुध्दा १८ जुलै २०२२ होती. हा योगायोगच की ता. १८ जुलै २०२३ रोजी कुंभा व वनोजा (देवी) या महसुली मंडळात अतिवृष्टी होऊन ४७६ हेक्टर मधिल पीकाचे झालेल्या अतिवृष्टीत नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची आठवण ताजी होत शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.
यात वनोजा मंडळात ३९२ हेक्टर असुन यात वनोजा ७० हेक्टर, डोल डोंगरगाव १००, आपटी १४०,हिवरा मजरा १२, शिवणी धोबे ७० हेक्टर वरील पीकांचे नुकसान झाले आहे, तर कुंभा महसूल मंडळात ८४ हेक्टर वरील पीकांचे नुकसान असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पर्जन्यमान –
ता.१९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता घेतलेल्या पावसाची नोंद.
१) मारेगाव ५५ मि.मी.
२) मार्डी. ७० मि. मी.
३)वनोजादेवी ६६ मि मी
४) बोटोनी. ६५ मि मी.
५) कुंभा ६७ मि.मी.





