♦डॉक्टरला चार लाखांनी लुटले…
♦अज्ञात लुटमारांविरुद्ध गुन्हा दाखल
◊लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील नवरगाव येथील बंगाली डॉक्टर हाजरा हे नवरगाव येथुन प्रॅक्टिस करून मारेगाव येथे परतीच्या प्रवास असताना १३ मार्च रोजीच्या रात्री स्विफ्ट कारणे आलेल्या अज्ञात “लुटमारांनी” त्यांची स्कुटी नायरा पेट्रोल पंपाजवळ अडवून चाकू बंदुकीचा धाक दाखवत त्यांची लूटमार केली.
डॉ.पोभास रवींद्रनाथ हाजरा असे पीडित डॉक्टरचे नाव असून डॉक्टर हे मारेगावचे रहिवासी आहेत.तालुक्यातील नवरगाव येथे त्यांचा खाजगी दवाखाना असून ते दररोज मारेगाव-नवरगाव अशी ये-जा आपल्या दुचाकीने करीत असतात.
दरम्यान १३ मार्च रोजीच्या रात्री नवरगाव येथून मारेगाव येथे आपल्या घरी परत येत असताना राज्य महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ अज्ञात लूटमारांनी त्यांची स्कुटी अडवून त्यांना चाकूच्या धाकावर कारमध्ये बसवत तब्बल २४ हजार रुपये नगदी,अंगठी,३० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन सह त्यांचा मोबाईल ताब्यात घेत २५ लाख रुपयांची मागणी केली.
काही वेळ चाललेल्या या थरारक सिने स्टाईल प्रकाराने डॉ.हाजरा यांनी घाबरून जात तीन लाख रुपये लुटमारांना देण्याचे कबूल केले.वणी येथील एका मित्राकडून पैसे घेऊन देतो असे सांगून त्यांनी वणी येथील मित्राला फोन लावला असता अज्ञात लुटमारा त्यांना कार स्वतःच्या स्विफ्ट कार मध्येच वणी येथे घेऊन गेले. मित्राकडून तीन लाख रुपये घेऊन डॉक्टर ने लूटमारांना दिले असता लुटमारांनी मारेगाव जवळ येऊन डॉक्टरला रस्त्यावरच एकटे सोडून तिथून पोबारा केला.
अज्ञात लुटमारांनी डॉक्टर कडून एकूण चार लाख रुपयांचा ऐवज लुटला असुन एका डॉक्टर वर झालेल्या या “सिनेस्टाईल लुटमारीने” शहरात कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे.सदर घटनेची पोलिसात तक्रार दाखल होताच अज्ञात लुटमारांविरुद्ध भादवी कलम ३९२,३६३,३६४ (अ),३/२५,४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेच्या पुढील तपास मारेगाव पो.स्टे.चे ठाणेदार राजेश पुरी, ना.पो.का.अजय वाभिटकर करीत आहे.
