– भाजप जनता युवा मोर्चा यांचे तहसीलदारांना निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वरोरा तालुक्यातील एकोणा ओपन कोळसा खाणीतून उच्च दाबाचे धोकादायक ब्लास्टिंग होत असल्याने मार्डी परिसरातील घरांना हादरे बसत असून सदर ब्लास्टिंग त्वरित थांबवण्यात यावे अशा आशयाचे निवेदन १९ जुन रोजी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे उपस्थितीत भा.ज.यु.मोर्चा यांनी तहसीलदारांना दिले.
वरोरा तालुक्यातील एकोना ओपन कोळसा खाणीतून शक्तीशाली उच्च दाबाचे ब्लास्टिंग सुरू आहे.परिणामी मारेगाव तालुक्यातील शिवणी,कानडा, मुकटा,चनोडा, चोपण,दांडगाव, आपटी,गोरज, हिवरा, वनोजा देवी आदी गावांना दुपारी हादरे बसत असून मार्डी परिसरातील काही घरांना तडे जात आहे.
परिणामी घरांची वयोमर्यादा कमी होऊन घर लवकर पडण्याची भीती निर्माण झाली असून ब्लास्टिंगमुळे वयोवृद्धांना नाहक त्रास होतो आहे.उच्च दाबाचे धोकादायक ब्लास्टिंग त्वरित थांबवण्यात यावे अशा आशयाचे निवेदन ता.१९ जुन रोजी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे उपस्थितीत तहसीलदारांना देण्यात आले.
यावेळी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार,भाजप तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य अविनाश लांबट,विजय खिरटकर,प्रसाद झाडे,गणपत वर्हाटे,गणेश झाडे (भाजयुमो),हुकेश नांदे,धनराज ढवस,सुनिल झिले, अभिजीत ढवस,मारोती कोंढेकर, प्रशांत भंडारी,राजु मिलमिले,भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव प्रसाद सुधाकर ढवस आदी उपस्थित होते.




