— युवक काँग्रेस च्या पाठपुराव्याला यश
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
सन ऑक्टोंबर २०२२ मध्ये युवक काँग्रेस तालूका अध्यक्ष तथा नगरसेवक आकाश बदकी व कार्यकर्त्यानी तत्कालीन तहसीलदार दीपक पुंडे यांना चाळण झालेला मारेगांव- मार्डी मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन दिले होते. व बदकी यांनी दुरुस्ती बाबत सातत्याने पाठपुरावा केल्याने तीन कि.मी. रस्त्याच्या बांधकामला २.५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असुन, आठवडाभरात बांधकाम सुरु होणार असल्याची आकाश बदकी यांनी माहीती दिली.

दरम्यान मारेगांव मार्डी मार्गावर जड वाहतूक होत असल्याने मारेगाव- भालेवाडी पर्यंत या मार्गाची अक्षरशः चाळण होऊ मोठमोठे खड्डे पडले असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनासह पांथस्थांना सुध्दा अपघाताच्या भितीने जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक आकाश बदकी यांनी युवा कार्यकर्त्यांसह तत्कालीन तहसीलदार दीपक पुंडे यांना ऑक्टोबर २०२२ मध्ये निवेदन दिले होते. व सातत्याने याबाबत वारंवार पाठपूरावा सुध्दा करण्यात आला होता.
बदकी यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असुन मार्डी चौक ते भालेवाडी फाटा या ३ किमी. लांबीच्या मार्गाला २.५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तथा सदर रस्त्याचे बांधकाम आठवडाभरात सुरु होईल असा आशावाद सुध्दा आकाश बदकी यांनी व्यक्त केला.
दोन वर्षापुर्वी निवेदन देऊन आकाश बदकी यांना पाठपुराव्यासाठी प्रवीण काले, राहुल चौधरी, पंकज पिदुरकर, योगेश फाटे, आशिष मस्की, प्रमोद दुधकोहले, अतुल चौधरी, राजू कापसे, बलीराम आत्राम या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोलाची साथ दिली.




