– नाखले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मार्डी येथील सुपरिचित व्यक्तिमत्व तसेच दैनिक देशोन्नतीचे सुरेश नाखले यांचे वडील तानबाजी नाखले यांचे ता.१५ सप्टेंबर रोजी रात्री दोन वाजे दरम्यान नागपूर येथील मेदांता रुग्णालयात निधन झाले.मृत्यू समयी ते ८० वर्षाचे होते.
तानबाजी नाखले यांच्या कार्याचा आलेख तसा मोठाच.तानाजी नाखले मार्डी येथील माजी सरपंच, मुख्याध्यापक, मार्डी येथील तंटामुक्ती समितीचे पहिले अध्यक्ष तसेच इंदिरा स्मृती मंडळ,मारेगाव या शिक्षण संस्थेचे संचालक होते. सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचा सिंहाचा वाटा होता.
दरम्यान १५ सप्टेंबर रोजी दुपारी तानबाजी यांना श्वास घेण्यास अडचण येऊ लागली.लगेच त्यांना वणी येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. वणी येथून नागपूर येथील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले असता तेथे उपचारादरम्यान रात्री २ वाजेदरम्यान ताणबाजी यांची प्राणज्योत मालवली.
तानबाजी यांच्या एक्झिटने नाखले कुटुंबीयांवर पुरता दुःखाचा डोंगर कोसळला असून एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व इहलोकी गेल्याने मार्डी परिसरात पुरती शोककळा पसरली आहे.
आज दुपारी १२ वाजता तानबाजी यांचे पार्थिवावर मार्डी येथील स्मशानभूमीत हिंदू रितीरिवाज प्रमाणे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.





