– मारेगाव तालुका कोतवाल संघटनेचे आयोजन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
कोतवाल बळवंत पेकाची कोवे यांचा निरोप समारंभ तर नवनियुक्त कोतवालांच्या स्वागत समारंभाचे आयोजन मारेगाव तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने स्थानिक शेतकरी मंदिरात ४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता करण्यात आले होते.
आनंद व अश्रू एकत्र आलेल्या या छोटेखानी सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा तर प्रमुख पाहुणे मारेगाव तालुका कोतवाल संघटनेचे अध्यक्ष सुरेश येरमे होते.
मारेगाव तालुका कोतवाल संघटनेच्या वतीने आयोजित या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यात कोतवाल बळवंत पेकाची कोवे यांचा कार्यपूर्ती सत्कार करण्यात आला.तर नवनियुक्त कोतवालांचा स्वागत समारंभही मोठ्या आनंदात पार पडला.
सत्कार सोहळ्याचे संचालन कु.रोशनी वरखडे तर आभार प्रदर्शन विनोद मडावी यांनी केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा, कोतवाल संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश येरमे,यवतमाळ जिल्हाध्यक्ष शशिकांत निमकर शशिकांत निमसटकर यांचेसह तालुक्यातील सर्व कोतवाल बांधव उपस्थित होते.




