– नवीन बिईओ स्नेहदीप काटकर रुजू
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
येथील गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडूरवार यांचा कार्यकाळ समाप्त झाल्याने त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा १ ऑगस्ट रोजी स्थानिक पंचायत समिती येथे मुख्याध्यापक संघाद्वारे आयोजित करण्यात आला होता.यावेळी नरेंद्र कांडुरवार यांना सेवापूर्ती निरोप देण्यात आला तर नवीन बिईओ स्नेहदीप काटकर यांचे स्वागत करण्यात आले.
कायमच मारेगाव तालुक्यात शिक्षकांची कमतरता असल्याने उपलब्ध विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक जुळविणे तसे कठीणच.यातच १९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून नरेंद्र कांडूरवार यांची नियुक्ती येथे करण्यात आली.

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांवर शिक्षकांची कमतरता असूनही बिईओंनी कामात योग्य ताळमेळ ठेवून शेकडो गोष्टींचे नियोजन करत तालुक्यातील शाळांचा गाडा सुरळीत हाकला.आपल्या स्वभावाने सर्वांना आपलसं करून आपला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला.

आज ता.१ ऑगस्ट रोजी मुख्याध्यापक संघाद्वारा स्थानिक पंचायत समिती कार्यालयात त्यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मनमिळाऊ गटशिक्षणाधिकाऱ्यांना निरोप तर नवीन गटशिक्षणाधिकाऱ्यांचा स्वागत सोहळा पार पडला.परिणामी नवीन गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर यांनी कामाची सुत्रे आपल्या हाती घेतली.

यावेळी मुख्याध्यापक सुधाकर काळे,सुनित पी.आष्टेकार,संजय व्ही. देवाळकर,भुदेव पौडे,भारत गारघाटे,राजेश पोटे,सुभाष चिकटे,योगेश वेल्ले,सुषमा निद्रा,हेमंत चौधरी,दिलीप पाटील,एम.एम.महाडके, दिलीप बि.एम.निखाडे,प्रविण किशोर जोगी,हेमंत अनिल ताजणे,संदिप विठ्ठलराव देरकर,राकेश ठाकरे,मिलींद कुंभारे,पाटील सर आदी उपस्थित होते.




