— जळका येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगाव.
स्पर्धा परिक्षेची तयारी करत असतानाच जळका येथील एका २३ वर्षीय युवकाने त्यांच्या शेतात रोहीनीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ता.१७ मे रोजी ५ वाजेदरम्यान उघडकीस आली.
आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव प्रीतम हुसेन आत्राम (२३) असुन, आई वडील व थोरल्या भावासह मृतक प्रीतम जळका येथे वास्तव्यास होता. शेती कमी असल्यामुळे शेतातील कामे व उरल्या दिवसात रोजमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मृतक प्रीतम यानी सुध्दा शेती काम व रोजमजुरी करुन ग्रॅज्युएशन पुर्ण करुन तो आता स्पर्धा परिक्षेची तयारी करत असल्याची माहीती आहे.
दरम्यान ता. १७ मे रोजी १२.३० वाजेदरम्यान मृतक प्रीतम यांनी बाहेर जाऊ येतो असे सांगत घराबाहेर गेला. बराच वेळ झाला घरी परत आला नसल्याने गावात व गाव परीसरात त्याचा शोध घेतला. परंतू कुठेही आढळला नाही. सायंकाळी पाच वाजताचे सुमारास गावातील नातेवाईक व थोरला भाऊ शेताकडे भावाचा शोध घेण्याकरीता गेले असता रोहिनीच्या झाडाखाली गळ्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. प्रीतम च्या पाठीमागे आई-वडील व, थोरला भाऊ आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांचे मार्गदर्शनात जमदार दिगंबर किनाके करीत आहेत.




