– बेलोरा नवोदय विद्यालयात गिरवणार ज्ञानाचे धडे
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील खैरगाव (बु) येथील कु.निधी संजय आवारी ही विद्यार्थिनी इयत्ता दहावीत ९१.४०% गुण घेत उत्तीर्ण झाली होती.परिणामी निधीची इयत्ता ११ वी करीता बेलोरा (ता.घाटंजी) येथील नवोदय महाविद्यालयात निवड करण्यात आली आहे.निधी आता पुढील अभ्यासक्रमाचे धडे बेलोरा नवोदय विद्यालयात गिरवणार असून निधीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील असलेल्या निधीला घरूनच शिक्षणाचा वसा लाभला आहे. निधी पहिल्या वर्गापासून लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल ,वणी येथील विद्यार्थिनी आहे.ती संजय आवारी यांची कन्या आहे.
दरम्यान एसएससी परीक्षेत निधीने ९१.४०% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले होते.यामुळेच निधीची घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील नवोदय विद्यालयात इयत्ता ११ करिता निवड झाली आहे. पुढील दोन वर्ष निधी नवोदय महाविद्यालयात ज्ञानाचे धडे गिरवणार आहे.निधीच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कु.निधीने आपल्या यशाचे श्रेय आई,वडील संजय आवारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना दिले आहे.




