– तिसऱ्या दिवशी टँकरने पाणीपुरवठा
– प्रशासनाने दखल घेण्याची गरज
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
ऊन्हाळा सुरू होताच मारेगावात पाणी प्रश्न ऐरणीवर आला असुन गेल्या चार दिवसा पासून प्रभाग क्र.१६ स्थित बोअर नादुरुस्त असल्याने शहरातील काही प्रभागातील पाणी पुरवठा खंडित झाला आहे.आज तिसऱ्या दिवशी काही प्रभागात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १६ स्थित असलेली बोअर गेल्या चार दिवसापासून बंद असल्याने येथील प्रभाग क्र.१६ पुर्ण, प्रभाग क्र.१५ चा सत्तर टक्के भाग, प्रभाग क्र.८ पुर्ण तसेच प्रभाग क्र.१४ चा चाळीस टक्के भाग पाण्याविना प्रभावित झाल्याने चार दिवस उलटूनही प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये प्रशासना विरुद्ध कमालीचा रोष निर्माण झाला आहे.
ऐन उन्हाळ्याच्या दिवसात गेल्या चार दिवसापासून बंद असलेला पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम करण्याची गरज असताना कामाची गती मंदावल्याचे चित्र दिसत असून प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
