लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव.
मारेगाव येथील एका २७ वर्षीय उच्चशिक्षित युवतीने स्वतःच्याच घरी ओढणीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना ता. ८ मे रोज गुरुवारला सकाळी ६.३० वाजता उघडकीस आली.
दिक्षा केशव उमरे (२७) मृतक युवतीचे नाव असुन मारेगाव येथे वार्ड क्रमांक १६ मध्ये वास्तव्यास होत्या. त्या उच्च शिक्षित असून दिक्षा यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून औरंगाबाद येथील कंपनीत जॉब करीत असल्याची माहीती आहे.
दरम्यान ता ८ मे रोजी सकाळी ६.३० वाजता वडील उठले मात्र दिक्षा दिसत नसल्याने हाॅल लगत असलेल्या शयन कक्षाचा दरवाजा काढण्याचा प्रयत्न केला. परंतू दरवाजा बंद होता. आवाज देऊनही आतुन प्रतिसाद येत नसल्याने शेजाऱ्यांना बोलावून त्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. मात्र दिक्षा ही सिलींग
फॅनला ओढणी बांधुन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. लगेच पोलीस स्टेशनला कळवून मृत देह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. वृत लिहिस्तोवर आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
दिक्षाच्या पश्चात आई, सेवानिवृत्त वडील व एक लहान बहीण असा प्राप्त परिवार आहे. सदर घटनेने मारेगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांचे मार्गदर्शनात जमदार आनंद अलचेवार करीत आहे.




