लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
स्वामी विवेकानंद जयंतीदिनी मारेगाव येथील स्वामी विवेकानंद वाचनालय व मार्गदर्शन केंद्राचा ९ वा वर्धापन दिन ता. १२ जानेवारीला थाटात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास मेश्राम, प्रमुख मार्गदर्शक प्रवीण खंडाळकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून आशिष सर अचलपूर हे उपस्थित होते.
मारेगाव हा आदिवासीबहुल तालूका असल्याने तालुक्यातील होतकरु गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन स्पर्धा परिक्षेत यश मिळविणे आर्थिक परिस्थितीमुळे शक्य होत नसल्याने ता. १२ जानेवारी २०१५ रोजी स्वामी विवेकानंद अभ्यासिकेची स्थापणा करण्यात आली. या नऊ वर्षांत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासह शहरी विभागातील विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेच्या माध्यमातून यथोचित ज्ञानार्जन करीत यश संपादन केले. अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक युवक युवतीं नोकरीला आहेत.
यावेळी यावेळी सीमा आत्राम, अनामिका उईके, अविनाश टेकाम (सर्व ग्रामसेवक) सुहास उताणे, आरोग्य सेवक, मंगेश भेदुरकर, स्टेनोग्राफर, मनोज भेदुरकर एम.एस.एफ. इत्यादी यशस्वी विद्यार्थ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रवीण पोटे यांनी तर आभार शंकर सिडाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश मुरझडीसह अभ्यासिकेतील युवकांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती होती.




