– तालुका शाखा मनसेचे उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन
– दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
रब्बी हंगामाची सुरुवात झाल्याने शेती पिकांना पाण्याची नितांत गरज आहे.परंतु महावितरण कडून वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने रब्बी पिकांना पाणी देण्यात अडचण येत आहे.परिणामी महावितरण कडून सुरू असलेले भारनियमन बंद करून कृषी पंपांना व गावठाण फिडरला सुरळीत वीजपुरवठा सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा मनसेचे मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेश ढोके यांचे नेतृत्वात उपकार्यकारी अभियंत्यांना ता.२१ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
नुकतीच रब्बी हंगामाची सुरुवात झाली आहे.परिणामी शेतकऱ्यांकडुन शेतात चना,मिरची आदी नगदी पिकांची लागवड करण्यात आली आहे.परंतु महावितरण कडून सुरू असलेले भारनियमन रब्बी पिकांना पाणी देण्यात अडसर ठरत आहे.
दरम्यान २१ नोव्हेंबर रोजी मनसेचे मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेश ढोके यांचे नेतृत्वात असंख्य मनसे सैनिकांनी उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले.यात महावितरण कडून सुरू असलेले अघोषित भारनियमन बंद करून कृषी पंपांना व गावठाण फिडरला सुरळीत वीजपुरवठा सुरू करा ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे.सदर निवेदनाची दखल ८ दिवसाचे आत घेतली न गेल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी मनसेचे तालुका अध्यक्ष रूपेश ढोके,तालुका उपाध्यक्ष उदय खीरटकर,मार्डी विभाग अध्यक्ष रोहित हस्ते,कुंभा विभाग अध्यक्ष आदित्य बूच्चे तसेच मनसे शाखा अध्यक्ष चोपन देवेंद्र खिरटकर, गौरव आसेकर,अजय जुनगरी आदी उपस्थित होते.




