– मारेगाव तालुक्यातील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शेतात चरण्यास जात असलेल्या बैलास जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने बैल जागीच ठार झाल्याची दुःखद घटना तालुक्यातील म्हैसदोडका येथे १९ जुलै रोजी सकाळी घडली.परिणामी ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मारोती भिवाजी घागी रा.म्हैसदोडका असे बैल मृत्युमुखी पडुन आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे सिमेंट रस्त्यालगत असलेल्या विजेच्या खांबावर डीपी लावलेली आहे.या खांबावरील जिवंत विद्युत तार तुटून जमिनीवर पडून असल्याने येथून शेतात चरण्यास जात असलेल्या मारुती घागी यांचे बैलाचा स्पर्श या विद्युतवाहक तारेस झाला.परिणामी बैल जागीच ठार झाला.

ऐन शेतीच्या हंगामात ४५-५० हजार रूपये किंमतीचा बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.परिणामी तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्याची मागणी आहे.





