– मारेगाव तालुक्यातील घटना
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील एका गावातील एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसी वर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली.याप्रकरणी मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी युवकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावातील एका युवतीची एक वर्षापूर्वी गणेश अभिमान आत्राम (२६) रा. इंदिरा ग्राम (नगारापोड) येथे राहणाऱ्या युवकाशी मैत्री झाली.कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.प्रियकर युवक युवतीला लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर गेल्या वर्षभरापासुन शारीरिक अत्याचार करत होता.पिडीतेच्या घरी कोणी नसताना वारंवार तिच्यावर प्रियकराकडुन अत्याचार केला गेला.
दरम्यान २८ मार्च रोजी दुपारी पिडीत युवती शेतात गेली असता प्रियकर शेतात पोहोचला.पिडीतेला आपण उद्या लग्न करू असे म्हणून स्वतःचे घरी घेऊन गेला असता आरोपी युवकाच्या घरच्यांनी युवतीला ‘माझ्या मुलाचे लग्न तुझ्याशी लावून देतो’ असे सांगितले. या दरम्यान आरोपीने पिडीतेशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
परंतु तीन एप्रिल रोजी आरोपीचे मन बदलले आणि तो दिलेल्या शब्दाला मुकला. आरोपीने ‘तुझ्याशी लग्न करणार नाही;जे होते ते करुन घे’ चा पवित्रा घेतल्याने पिडीतेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
ही बाब पीडीतेने आपल्या घरच्यांना सांगितली असता पीडित युवतीच्या घरच्यांनी आरोपीच्या घरी जाऊन आरोपीची समज काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने लग्नास सपशेल नकार दिल्याने अखेर पीडीतेने मारेगाव पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली.
पिडीतेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रियकरा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास मारेगाव पो.स्टे.ठाणेदार राजेश पुरी,पो.ना.अजय वाभिटकर,पो.ना.रजनिकांत पाटील करीत आहे.
