– एक वर्षाचे बाळ आईविना पोरके
– तालुक्यातील कुंभा येथील घटनेने परिसरात हळहळ
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील एका ३५ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजे दरम्यान उघडकीस आली.मृतक विवाहित महिलेस केवळ १ वर्षाचे बाळ असुन आईविना बाळ पोरके झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतिभा गणपत मोहुर्ले (३५) रा.कुंभा असे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेले विवाहित महिलेचे नाव आहे.
दरम्यान रविवारी रात्री विवाहित महिला स्वतःचे घरून निघून गेली.रात्री उशिरा बाळाच्या रडण्यावरुण ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली.परिणामी कुटुंबीयांनी महिलेचा परिसरात शोध घेतला. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.
दरम्यान सोमवारी सकाळी १० वाजता दरम्यान कुंभा परिसरातील टाकळी शिवारातील मोहुर्ले यांच्याच शेतातील विहीरीत सदर महिलेचा मृतदेह आढळून आला.
मृतक प्रतिभा यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला…ही बाब गुलदस्त्यात असुन आई गमविलेले मृतक प्रतिभा यांचे एक वर्षाचे बाळ पोरके झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
