– कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
येऊ घातलेल्या काळातील निवडणुकीच्या कामासंबंधी विस्तृत चर्चा करण्याकरिता भारतीय जनता पक्ष,मारेगाव मंडळाची बैठक ११ जून रोजी दुपारी १२ वाजता येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यात भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकांची पूर्वतयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. यात भारतीय जनता पक्षानेही आपली कंबर कसली असून रविवार ता.११ जुन रोजी दुपारी १२ वाजता मारेगावातील ज्येष्ठ नागरिक सभागृह, किन्हेकार ले आउट येथे वणी विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, वणी विधानसभेचे प्रमुख संजय पिंपळशेंडे,युवा मोर्चा राज्य उपाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सर्व भाजपा तालुका पदाधिकारी,लोकप्रतिनिधी,सर्व भाजपा आघाडीचे अध्यक्ष,बूथ प्रमुख, शक्तिकेद्र प्रमुख व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा मारेगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे यांचेसह तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे यांनी केले आहे.




